विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे खेलो इंडियातील विजेत्यांचा सत्कार

विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे खेलो इंडियातील विजेत्यांचा सत्कार

सेलू जि.परभणी : खेलो इंडिया युथ वुमेन्स झोनल स्पर्धा २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पार पडल्या.‌ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करीत विजय मिळविलेल्या परभणी जिल्ह्यातील खेळाडूंचा सेलू येथील विनोद बोराडे मित्रमंडळातर्फे मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईराज बोराडे, माजी नगरसेवक वाहिदभाई अन्सारी, राजेंद्र पवार, अमर सुरवसे, प्रतीक बोराडे आदींची उपस्थिती होती. विजय संघातील गायत्री वाकुडकर, साक्षी गोसावी, ऋतुजा बनसोडे, नंदिनी सरडे, साक्षी ढगे, राधिका चिलगर, अनुष्का लांडगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.‌ तसेचे परभणी जिल्हा वूशू असोसिएशनचे अध्यक्ष अजित वरपुडकर, सचिव पांडुरंग अंभुरे, प्रशिक्षक ओम परदेशी, रोनित बब्बर यांचादेखील सन्मान करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!