गणेशोत्सव व्याख्यानमाला : शुक्रवारपासून सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम 

गणेशोत्सव व्याख्यानमाला : शुक्रवारपासून सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम 

व्याख्यान, परिसंवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सेलू जि.परभणी : गणेशोत्सव काळात ज्ञान, मनोरंजन आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथे शुक्रवार ते सोमवार (१३ ते १६ सप्टेंबर) या कालावधीत गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजिण्यात आली आहे. व्याख्यान, परिसंवाद आणि स्थानिक कलावंत ‘संतवाणी महाराष्ट्राची’ हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम आहेत. व्याख्यानमालेचे ६३ वे वर्ष आहे. सेलूभूषण स्व.शंकरराव मंडलिक गुरुजीं यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव व्याख्यानमाला सुरू झाली. पुढे स्व.गिरीश लोडाया यांनी चिटणीस म्हणून २७ वर्षे नेटाने हा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनात या वर्षीही विविध कार्यक्रम होत आहेत. शुक्रवारी, १३ सप्टेंबररोजी ” मन करा रे प्रसन्न ” या विषयावर परभणी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी जालना येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर असतील.‌ शनिवारी, १४ सप्टेंबररोजी ” आमच्या जीवनातील आधुनिकता (नवीन तंत्रज्ञान) ” या विषयावर परिसंवाद आहे. यामध्ये प्रभाकर चव्हाळ (शेती), इंजिनिअर बी.एस.कोलते ( बांधकाम), प्राचार्य डॉ.उत्तम राठोड (शिक्षण), कावेरी भातलवंडे-सराफ ( बॅंकिंग), डॉ.अनिकेत जोगदंड ( वैद्यकीय), अविनाश बिहाणी (व्यापार), विलास पौळ (उद्योग), मोहन बोराडे (पत्रकारिता) यांचा सहभाग असेल. उद्योजक नीलेश बिनायके अध्यक्षस्थानी असतील. रविवारी, १५ सप्टेंबररोजी ” कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) – आज आणि उद्या ” या विषयावर कोपरगाव येथील संजीवनी इन्स्टिट्यूटचे सिनिअर डेटा सायंटिस्ट डॉ.राधाकृष्ण नाईक यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील सॉफ्टवेअर डेव्हलपर अक्षय वाळिंबे असतील. सोमवारी, १६ सप्टेंबररोजी स्थानिक कलावंत ‘संतवाणी महाराष्ट्राची’ हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. गिरीश दीक्षित (तबला), गंगाधर कान्हेकर (मृदंग), प्रकाश सुरवसे (टाळ) साथसंगत करतील. उद्घाटक म्हणून तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांची उपस्थिती राहणार आहे. माजी आमदार हरिभाऊ लहाने अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनात संयोजक म्हणून प्रा.नागेश कान्हेकर, सुभाष मोहकरे, नरेंद्र झाल्टे, डॉ.गंगाधर गळगे, नारायण इक्कर, धनंजय भागवत, भालचंद्र गांजापूरकर, प्रणिता सोलापुरे, शरद ठाकर, प्रा.संजय पिंपळगांवकर, सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर आदी काम पाहात आहेत. व्याख्यानमालेस रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संतोष पाटील, चिटणीस अजित मंडलिक, समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी, राजेश ढगे, लता गिल्डा यांनी केले आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वला भाला, उपाध्यक्ष किशोर जोशी, डॉ.ऋतुराज साडेगावकर, बाबासाहेब हेलसकर, चंद्रशेखर नावाडे, बाबासाहेब चारठाणकर, प्रा.प्रभाकर रावते, उपेंद्र बेल्लूरकर, संजय वाघ, बी.टी.गजमल, शोभा ढवळे, शोभा कोरडे, जयश्री सोन्नेकर, सुधाकर नरळदकर, भगवान देवकते, डी.डी.सोन्नेकर, सुरेश हिवाळे, महंमद इलियास, संतोष खाडप, कल्याण पवार, सहचिटणीस दिलीप डासाळकर, ललिता गिल्डा, के.जी.कुलकर्णी, सतीश बाहेती, सतिश नावाडे, गणेश माळवे, रवि कुलकर्णी, रवि मुळावेकर, आर.डी.कटारे, आनंद बाहेती, एन.एम.देशपांडे, रुपा काला, मीरा बहिवाल, दुर्गादास कुलकर्णी, जी.ए.गुंजकर, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी विटेकर, रेवणअप्पा साळेगावकर, प्रवीण माणकेश्वर, गुरूबसअप्पा पंचगल्ले, प्रशांत नाईक, विलास शिंदे, मोहन खापरखुंटीकर, सदस्य गीता मुळावेकर, पौर्णिमा जोहीरे, एस.आर.देशपांडे, एन.जी.बंगाळे, रौफखान पठाण, अनिल कौसडीकर, आर.जी.गोरे, प्रा.देविदास ढेकळे, मधुरा खारकर, नीता मालाणी, चंदा मेहता, संध्या फुलपगार, अनिता कुलकर्णी, नीता बलदवा, सविता कासट, मेघना चौधरी, मीना मालाणी, राजश्री शिवणकर, संगीता खारकर, वसुधा खारकर आदींसह आदींसह पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

‘संतवाणी महाराष्ट्राची’ मध्ये ७० कलावंतांचा सहभाग : सोमवारी, १६ सप्टेंबररोजी ७० स्थानिक कलावंतांचा संच ‘संतवाणी महाराष्ट्राची’ हा गीत संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये डॉ.विलास मोरे, डॉ.राजेंद्र मुळावेकर, संजय मंडलिक, डॉ.भास्कर शिंदे, लक्ष्मीकांत दिग्रसकर, सतिश ताठे, सुरेंद्र दिशागत, संतोष कुलकर्णी, बंडूनाना कदम, शिरीष संगई, अलका धर्माधिकारी, सुरेखा चारठाणकर, प्रिती राठी, सुषमा दामा, सीमा सुक्ते, शुभांगी मोहकरे, रेणुका बोठे, रेणुका वाकडीकर, सीमा आष्टीकर, मीरा देशमुख, अनघा पांडे, मनिषा पांडे, रमा बाहेती, सायली दिग्रसकर, धनश्री देशमुख, पद्मजा खारकर, आशा सावजी, प्रिती सराफ, मंजूषा बोराडे, प्रजोत पांचाळ, अथर्व तोडकर, अर्जुन इंगळे, अभिनीवेष मोगल, देवांश तोडकर, तिर्थेश संगई, श्लोक वाशींबे, शिवम कणसे, शिवांश बोराडे, श्रद्धा तेजबंद, श्रुती कुलकर्णी, स्नेहल जोगदंड, वैष्णवी बोठे, तनुश्री कोल्हे, अर्निका घोडके, सुविरा घोडके, प्रेरणा काष्टे, दर्शना जोशी, प्राजक्ता खरड, आर्या घांडगे, भक्ती शिंदे, संस्कृती सावजी, गौतमी मगर, ईश्वरी तालडे, अनया ढाकणे, लावण्या शेरे, अलफीया सय्यद, रोहिणी बोराडे, ज्ञानेश्वरी शिंदे, कीर्ती घांडगे, शर्वरी मोरे, श्रीशा लाडाणे आदी गायक कलाकारांचा सहभाग असेल. गिरीश दीक्षित (तबला), गंगाधर कान्हेकर (मृदंग), प्रकाश सुरवसे (टाळ) साथसंगत करतील. प्रा.संजय पिंपळगांवकर, सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर संयोजन करीत आहेत.

ना वर्गणी, ना मूर्तीची स्थापना : सेलू (जि.परभणी) येथील गणेशोत्सव व्याख्यानमालेला ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधनाची गेल्या ६२ वर्षांची परंपरा आहे. स्थानिक वक्ते, साहित्यिक, नाट्य, संगीत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनात नीटनेटकेपणा, शिस्त आजवर जपली गेली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच बैठकीत सर्वसंमतीने कार्यकारिणी निवडली जाते. आणि उपस्थित नागरिकांकडून स्वेच्छेने गोळा झालेल्या रकमेतून आयोजनाचा खर्च भागविला जातो. ना श्री गणेश मूर्तीची स्थापना होते. ना पावती बुकद्वारे वर्गणी जमा केली जाते. केवळ ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन, जनजागृती आणि मनोरंजन आदींवरच प्रामुख्याने भर दिला जातो.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!