श्री गणेशोत्सव २०२४ : मराठवाडा हायस्कूलचा देखावा लक्षवेधी

श्री गणेशोत्सव २०२४ : मराठवाडा हायस्कूलचा देखावा लक्षवेधी

श्री गणेशोत्सव २०२४ : मराठवाडा हायस्कूलचा देखावा लक्षवेधी

परभणी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील शिवाजी नगरातील एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘धगधगता-बांगलादेश’ हा देखावा उभा केला आहे. हा देखावा लक्षवेधी ठरला आहे. शाळेत दरवर्षी ज्वलंत विषयांच्या अनुषंगाने गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने एकाहून एक सरस देखावे उभारले. जालियनवाला बाग हत्याकांड, डोकालाम संघर्ष, पुस्तकांचा गणपती, झाडांचा गणपती, शिक्षक रुपातील गणपती आदी देखाव्यांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधले. यावर्षी बांगलादेशातील अभूतपूर्व गोंधळावस्था, सत्तांतर तसेच अल्पसंख्यांक हिंदुंवरील होणारे अत्याचार या विषयीचा ‘धगधगता-बांगलादेश’ हा देखावा साकारला आहे. देखावा साकारण्यासाठी अमोल गोरकट्टे, अविनाश कंधारकर, अविनाश जाधव, कल्पना खटींग, श्रीपाद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, यावर्षी प्रशालेत श्रींची प्रतिष्ठापना र्‍हदयरोगतज्ञ डॉ.गोपाल जवादे यांच्याहस्ते करण्यात आली. देखावा सर्वांसाठी खूला करण्यात आला. याप्रसंगी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिल आष्टूरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासूरकर, श्रीनिवास मुंदडा, अनंत पांडे, सूर्यकांत पाटील, सुनील रामपुरकर, विश्‍वास दिवाळकर, अभिजित कुलकर्णी, डॉ.सुनील तुरुकमाने आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!