संवेदनशीलता : मंत्री धनंजय मुंडेंनी वाचविले तरुणाचे वाचवले प्राण

ताफा थांबवून रस्त्यावरील अपघातग्रस्ताला तातडीची मदत

परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परळीला परततांना, सामाजिक न्याय मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (दोन मे) रात्री रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाला तातडीची मदत करीत प्राण वाचविले.

मंत्री धनंजय मुंडे हे, बीड वरून परळीकडे जात असताना, सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहताच मुंडे यांनी ताफा तात्काळ थांबवला. अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली. मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली. महेश नाव सांगून, त्या तरुणाने पांगरीचा (ता.परळी) असल्याचे सांगितले.

तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. मुंडे यांनी तत्काळ स्वीय सहायकांमार्फत, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावला. मुंडे स्वतः बोलल्यानंतर रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी हजर झाली. मुंडे यांनी, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तरुणाला दाखल करण्याचा; तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. तरुणास अंबाजोगाईकडे रवाना केल्यानंतर, घटनेची माहिती अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, मुंडे यांची रस्त्यात भेट झाली. तेव्हा ” ताई, तुम्ही काळजी करू नका. सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे. शुद्धीवर आहे. बोलतोय. रुग्णालयात देखील मी बोललो आहे.” असा धीर देत, मुंडे यांनी कुटुंबियांना अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!