अभूतपूर्व उत्साहात रमजान ईद साजरी

शहरासह ग्रामीण भागातही रमजान ईदचा हर्षोल्लास

सेलू,जि.परभणी : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी ( तीन मे) रमजान ईदचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी सामुहिक प्रार्थना करीत,  एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातही हर्षोल्लासात ईद साजरी करण्यात आली.

विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी यांनीही या वेळी हजेरी लावून, मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत, सद्भावना व्यक्त केल्या. शुभेच्छा दिल्या. परभणीतील ईदगाह मैदानावर सकाळी साडे आठ वाजता सामुहिक नमाज प्रार्थना अदा करण्यात आली; तसेच उर्स मैदान, धार रस्त्यांवरील खुले मैदान, गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड मैदानावरही सामुहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ईदगाह मैदानावर खासदार फौजिया खान, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार, तहेसीन अहेमद खान, तहसीलदार संजय बिरादार, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, विश्‍वांभर गावंडे, अली खान, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

सेलूमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

सेलू येथील नूतन रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी सामुहिक नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने प्रार्थना झाली. या वेळी सेलू भूषण (कै) शंकरराव मंडलिक गुरुजींनी सुरुवात केलेल्या सद्भावना मित्र मंडळासह सेलू तालुका खरेदी विक्री संघ, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि  प्रशासकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, संभाजी पवार, विनोद तरटे, दत्तराव आंधळे, डॉ.अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड, नृसिंह हरणे, सचिन राऊत, प्रदीप पवार, विनोद राजूरकर, अविनाश कोरडे, योगेश कुलकर्णी, अंकित डोंबे, सुदर्शन शेरे, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, नगराध्यक्ष विनोद बोराडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, उपनगरध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, अजित मंडलिक, गिरीश लोडाया, मुख्याध्यापक नारायण सोळंके, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, गौतम धापसे, सचिन कोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल, भारत इंद्रोके, शिवाजी गजमल, धनंजय भागवत, निर्मला लिपणे, विशाल देशमुख आदींनीही शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!