‘श्री जय तुळजाभवानी’ गणेश मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
कीर्तन , विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन
परभणी / सेलू : सेलू येथील फोफसे गल्लीतील श्री जय तुळजाभवानी गणेश मंडळाची स्थापना १९७५ मध्ये झाली. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने या वर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. महिला मंडळाच्या वतीने भजन संध्या, तसेच कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी महाआरतीसाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. अध्यक्ष आनंद फोपसे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव सुरज फोपसे व्यवस्थापक अभिजीत फोपसे, संतोष गायकवाड, गजानन टोलमारे, चेतन फोपसे, किरण दिग्रसकर, ॲड.नागेश दिग्रसकर, सदस्य कुलजीत फोपसे, स्वप्नील गायकवाड, अंबादास शेडूते, सुजीत फोपसे, कृष्णा देऊळगांवकर, अरुण फोपसे, अनिल गायकवाड, ज्ञानेश्वर शेडुते, अवीराज फोपसे, पंकज फोपसे, सचिन फोपसे, सत्यजीत फोपसे, अश्वीन टोलमारे, मयुर फोपसे, चिंतामणी दिग्रसकर, अमोल मगर, बालाजी देऊळगांवकर, विठ्ठल फोपसे, हर्षल फोपसे, अशिष जोशी, कैलास शहाणे, राम फोपसे, अतूल दिग्रसकर, निशीकांत पाटील, सागर मंडलिक, सुनिल फोपसे, कृष्णा चौधरी, गजानन काळबांडे आणि फोपसे गल्ली मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.