नूतन विद्यालय पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

नूतन विद्यालय पतपेढीची वार्षिक सभा उत्साहात

सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप

प्रारंभी सचिव शशिकांत देशपांडे यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ताळेबंदपत्रक सादर केला. एकूण भागभांडवल १० लाख ६७ हजार ६८० रुपये असून ठेवी ९८ लाख ८२ हजार ५५२ रूपये, कर्जवाटप १ कोटी २५ लाख‌ घं९ हजार ४३४ रुपये आहे. सरत्या आर्थिक वर्षात एकूण नफा ११,१८,४६५ रूपये असून दहा टक्के दराने सभासदांना लाभांश, तर सात टक्के दराने ठेवीवरील व्याज वाटप करण्यात आले. संस्थेला ऑडिट वर्ग ‘ब’ प्राप्त असून, नेट एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.

सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड सेलूची २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी पतपेढीचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संतोष पाटील होते. या वेळी मुख्याध्यापिका निशा पाटील, सुखानंद बेंडसुरे, उपाध्यक्ष एकनाथ जाधव, सचिव शशिकांत देशपांडे, सहसचिव बापूसाहेब पानझाडे, खजिनदार अनंत बोराडे, संचालक बाबासाहेब हेलसकर, बी.एन.पदमावत, सतीश कुंडीकर, सुनील तोडकर, सीमा सुकते, अनुजा सुभेदार, प्रशांत सावरगावकर, कल्पना चौधरी, रेणुका अंबेकर, अर्चना कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सचिव श्री.देशपांडे यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ताळेबंदपत्रक सादर केला. एकूण भागभांडवल १० लाख ६७ हजार ६८० रुपये असून ठेवी ९८ लाख ८२ हजार ५५२ रूपये, कर्जवाटप १ कोटी २५ लाख‌ घं९ हजार ४३४ रुपये आहे. सरत्या आर्थिक वर्षात एकूण नफा ११,१८,४६५ रूपये असून दहा टक्के दराने सभासदांना लाभांश, तर सात टक्के दराने ठेवीवरील व्याज वाटप करण्यात आले. संस्थेला ऑडिट वर्ग ‘ब’ प्राप्त असून, नेट एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली. यावेळी विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. दहावी, बारावी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कर करण्यात आला. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. यादीवाचन सुनील तोडकर, सीमा सुकते, बापूसाहेब पानझाडे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत देशपांडे यांनी, तर आभार सतीश कुंडीकर यांनी आभार मानले. सभेसाठी सभासद, कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!