व्हिजन इंग्लिश स्कूलची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड
सेलू/परभणी : सेलू् तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४ अंतर्गत १४ व १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत व्हिजन इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या अवंतिका हातनुरकर शैलेश कलालडे या विद्यार्थ्यांची परभणी जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्द्ल श्री गजानन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, युनिट हेड मनीष बोरगावकर, प्राचार्य हर्षद पांडव तसेच व्हिजन इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक रामा गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.