समूहगीत गायन स्पर्धेत सेलूच्या नूतन विद्यालयाची बाजी
सेलू/परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद कला महाविद्यालय आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे मराठवाडा विभागातील शाळांसाठी आयोजित शालेय समूहगीत गायन स्पर्धेत सेलू, जि.परभणी येथील नूतन विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत एकूण ३७ संघांनी सहभाग घेतला होता. नूतन विद्यालयाच्या विजयी संघात वैष्णवी पिंपळगावकर, मानसी दलाल, समृद्धी राखे, आर्या घांडगे, दर्शना जोशी, स्नेहल जोगदंड, श्रुती कुलकर्णी, वैष्णवी बोठे, ऋतुजा महाजन, अथर्व तोडकर, प्रज्योत पांचाळ, आनंद राऊत आणि विठ्ठल बोरसे यांचा समावेश आहे. त्यांना संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डी.आर.कुलकर्णी, डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सुनीता सांगुळे यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.