प्रा.शितल सोनटक्के यांचा वाढदिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

प्रा.शितल सोनटक्के यांचा वाढदिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

परभणी : परभणी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या सचिव, स्वाराती विद्यापीठ नांदेडच्या सिनेट मेंबर तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्या प्रा.शितल सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मांडाखळी येथील इंद्रायणी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आणि संताई कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठान तसेच राष्ट्रावादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक सेलचे मरावाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. याप्रसंगी सरपंच नागेश शिराळ पाटील, उपसरपंच शेख मोहसीन कृष्णा जोध आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.शितल सोनटक्के यांचा मांडाखळी ग्रामस्थ तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा.सोनटक्के यांनी मनोगतातून जून्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षणाने माणूस सक्षम बनतो. मला नेहमी अडचणीत मदत करणारे माणसे भेटली. त्यांची मी नेहमीच कृतज्ञ आहे. कोणत्याही संकटाला न घाबरता समर्थपणे आडचणीवर मात करण्याचा संदेश प्रा.सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना दिला. संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असा कानमंत्र दिला. अध्यक्षीय भाषणात प्रा.किरण सोनटक्के यांनी माझी पत्नी म्हणून शितल ह्या माझ्या यश-अपयशात खंबीरपणे पाठीशी राहून माझ्या कोणत्याही नाविन्यपूर्ण निर्णयात मजबूत आधार देत असतात. आम्ही दत्तक योजनेच्या माध्यमातून अनेक मुलामुलींना मोफत शिक्षण देत असतो. मुलगा-मुलगी असा भेद आम्ही कधीही केला नाही. प्रस्ताविक आर एस चाफे यांनी केले. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष कांचन कारेगावकर, मधुरा उमरीकर यांनी जोशी, नागेश शिराळ पाटील यांनी शिवराज सोनटक्के, गजानन लोहट, श्री.पांढरे, प्रा.कराळे ,श्री.खाडे, श्री डाढाळे, श्री नवनाथ, श्री.पौळ, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, गावकरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.देवकते यांनी केले श्री.डाढाळे यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!