शालेय जिल्हा सेपक टकारा स्पर्धा उत्साहात; सेलू, जिंतूचे वर्चस्व 

शालेय जिल्हा सेपक टकारा स्पर्धा उत्साहात; सेलू, जिंतूचे वर्चस्व 

सेलू/परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशन यांच्या वतीने नूतन विद्यालय सेलू येथे शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक निशांत धापसे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन समारंभात बोलताना निशांत धापसे यांनी शालेय जीवनातील क्रीडा स्पर्धा भविष्यात उपयुक्त ठरतात असे मत व्यक्त केले. “शाळेत मिळालेली शिदोरी भविष्यात निश्चितच फळ देणारी आहे. क्रीडा स्पर्धेतील हार-जीत स्वीकारता आली पाहिजे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, मुख्याध्यापक किरण देशपांडे, प्रा. नागेश कान्हेकर, जिल्हा सचिव गणेश माळवे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक यांनी केले.स्पर्धेच्या पंच म्हणून राजेश राठोड, संजय भुमकर, अनुराग आंमटी, विजय खंदारे आणि काकडे यांनी काम पाहिले.

अंतीम निकाल असा :

14 वर्षे मुले :

– प्रथम: एल.के.आर. प्रिन्स इंग्लिश, सेलू

– द्वितीय: नूतन विद्यालय, सेलू

14 वर्षे मुली :

– प्रथम: नूतन कन्या प्रशाला, सेलू

– द्वितीय: नूतन विद्यालय, सेलू

17 वर्षे मुले ;

– प्रथम: नूतन विद्यालय, सेलू

– द्वितीय: बिहाणी बाहेती नूतन विद्यालय, सेलू

– तृतीय: एल.के.आर. प्रिन्स इंग्लिश, सेलू

17 वर्षे मुली :

– प्रथम: नूतन विद्यालय, सेलू

– द्वितीय: ल.ला.रा. नूतन कन्या प्रशाला, सेलू

19 वर्षे मुले :

– प्रथम: नूतन महाविद्यालय, सेलू

– द्वितीय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय, जिंतूर

19 वर्षे मुली :

– प्रथम: नूतन विद्यालय, सेलू

– द्वितीय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय, जिंतूर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!