टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कपचे शानदार उद्घाटन
पुणे : टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडी, पुणे यांनी ‘टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप २०२४-२५चे आयोजन दि. १५ ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडी, पुणे येथे केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन एससीपी लक्ष्मण बोराटे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव बालवडकर (चेअरमन, टेनिस व्हॉलीबॉल महासंघ) होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. व्यंकटेश वांगवाड (टेनिस व्हॉलीबॉल जनक), शरदचंद्र घाररुकर (अध्यक्ष, शा.शि शिः महासंघ), मिलिंद क्षिरसागर (उपाध्यक्ष, शा.शि शि महासंघ), धर्मविरसिंग जडेजा (कोषाध्यक्ष, टेनिस व्हॉलीबॉल महासंघ), नागेश्वर राव (सरचिटणीस, कर्नाटक असो.), रामेश्वर कोरडे (विभागीय सचिव, महाराष्ट्र) आणि अंजली दळवी (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे (टेनिस हॉलीबॉल सचिव, महाराष्ट्र) यांनी केले, तर मनोगत डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या प्रगतीची माहिती दिली. उद्घाटन भाषणात बोराटे लक्ष्मण यांनी महाराष्ट्रातल्या टेनिस व्हॉलीबॉलच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आणि या खेळाला शासनाने प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप गणपतराव बालवडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रितेश वांगवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल बनसोड यांनी केले.ज्ञफेडरेशन कप साठी देशभरातील १६ संघांचा समावेश आहे, ज्यात महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओडिशा, झारखंड, दिल्ली, आणि पाँडेचरीतील पुरुष व महिला संघांचा समावेश आहे. दोन दिवसांमध्ये प्रकाशझोतात खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांची सुरुवात गुजरात आणि केरळ यांच्यातील सामन्याने झाली, ज्यात गुजरात २:० ने विजयी झाला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिनेश शिगारम, संदिप भोसले, आशिष ओबेरॉय, गणेश पाटील, आणि राजेंद्र मागाडे हे परीश्रम घेत आहेत.