सेलू येथील डॉ.दिपाली कुलकर्णी जर्मनीसाठी रवाना

सेलू येथील डॉ.दिपाली कुलकर्णी जर्मनीसाठी रवाना

सेलू, जि.परभणी : येथील रहिवासी डॉ.दिपाली संतोष कुलकर्णी यांना हेडेलबर्ग युनिव्हर्सिटी, जर्मनी येथे ‘इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ’ या विषयावर स्नातकोत्तर शिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. त्यासाठी त्या रवाना झाल्या आहेत. त्यांच्या निवडीचे आनंदाने स्वागत होत आहे कारण यासाठी संपूर्ण जगातून फक्त वीस जागा उपलब्ध आहेत. डॉ.दिपाली कुलकर्णी या सेलू शहरातील शिक्षक कॉलनीतील शिक्षक वसंतराव कुलकर्णी यांच्या नात आहेत. डॉ.दिपाली यांचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले असून मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीसुद्धा प्राप्त केली आहे. भविष्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) मध्ये सेवा व संशोधन करण्याची त्यांची आकांक्षा आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!