टिबी मुक्तअभियानात ग्रामपंचायतींचे कार्य कौतुकास्पद : अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

टिबी मुक्तअभियानात ग्रामपंचायतींचे कार्य कौतुकास्पद : अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

उल्लेखनीय कार्याबद्दल ४१ ग्रामपंचायतीचा गौरव 

परभणी : टिबीमुक्त अभियानात जिल्ह्यातील ग्रामपंचायती कौतुकास्पद कार्य करत असल्याचे प्रतिपादन परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत टिबीमुक्त ४१ ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी डॉ.काळे बोलत होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदिप घोन्सीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहूल गिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.राजू सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुधाकर पोले, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कौस्तव दासगुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये टीबी मुक्त पंचायत अभियानामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परभणी ग्रामीण १, जिंतूर तालुक्यातील १४, गंगाखेड ४, पालम ४, सोनपेठ २, मानवत ४, पूर्णा ५, सेलू ७ अशा एकूण ४१ ग्रामपंचायतीचा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विठ्ठल रणबावरे यांनी केले. डॉ.श्यामसुंदर लोखंडे यांनी आभार मानले. पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती आदींची उपस्थिती होती. संयोजन बी.के.गायकवाड, दिलीप वाकले यांनी केले. जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!