‘ज्ञानसाधना’मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना केंद्राचे उद्घाटन
परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अंतर्गत ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसीला आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना केंद्र म्हणून मंजुरी मिळाली आहे. दूरदृष्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे २० सप्टेंबररोजी उद्धाटन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच विशेष निमंत्रित संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के सचिव शितल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राअंतर्गत ड्रग् सेफ्टी व असोसिएट रेग्युलेटरी अफेयर्स हे दोन कोर्स चालणार असून त्याकरिता बी.फार्म ग्रॅज्युएट, बीएससी मायक्रोबायोलॉजी विषयातून ग्रॅज्युएशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ विनामूल्य घेता येणार आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा,असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे.