मोहम्मद पैगंबरांचे विचार सर्वांसाठी आदर्श : मौलाना मुख्तार
सेलू/परभणी : हाजरत मोहम्मद पैगंम्बर हे जग भरातील मानवासाठी सत्य दया करुणा एकात्मतेचा संदेश घेवून आले होते. त्यांचा विचार हा सर्व जाती धर्मासाठी आदर्श असल्याचे मत धुळे येथील मौलाना मुख्तार खासमी यांनी व्यक्त केले. मोहम्मद पैगंम्बर यांच्या जन्मदिनाचे औचितसाधून मोलाना आझाद नगर येथील बिलाल मस्जीदमध्ये पैगंमबराचे जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी व्याखानाचे अयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी मोहम्मद याहिया खान हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मौलाना रईस खासमी, मौलाना उस्मान मिल्ली, मौलाना मुखतदिर होते.
या वेळी पुढे बोलतांना मूखतार खासमी म्हणाले की; मोहम्मद पैगंबराचे जिवन चरित्र यावर कितीही प्रकाश टाकला, तरी कमीच पडणार. त्यांनी आपले सर्व जिवन मानव कल्याणासाठी अर्पित केलेले होते. अल्लाहने दाखविलेले मार्ग निवडा. सत्यावर चला पाप करू नका. द्बवेष, मत्सर बाळगू नका. कोणावर अन्याय करू नका या गोष्टीची शिकवण पैगंम्बरांनी दिलेली आहे. आपण जिवनात या गोष्टी पाळल्या तर मानव जिवनाचे कल्याणच होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हाफेज असलम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद इम्रान हाशमी, सोहेल खाॅन, अब्दुल वाजीद, सौदागर इम्रान ,शेख अखीब, शाहेद लाला,शेख मुशीरसह आझादनगरच्या युवकांचा सहभाग होता.