मराठवाड्यात पाऊस; पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

मराठवाड्यात पाऊस; पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपले. अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. येत्या २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परभणी शहरासह सेलू, जिंतूर, पाथरी, गंगाखेड तालुक्यांत जोरदार पाऊस शहरात पावसाची रिपरिप छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्तेकाम सुरू असलेल्या भागात वाहनचालकांना पावसामुळे कसरत करावी लागली. झाला. हिंगोली जिल्ह्यालाही पावसाने झोडपले आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. धाराशिव शहर व परिसरात सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. कळंब, परंडा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मांजरा धरण ९२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस होऊन आवक वाढल्यास धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाईल, अशी माहिती शाखाधिकारी मांजरा धरण सूरज निकम यांनी दिली. निम्र तेरणा प्रकल्पातून नदीपात्रात १५२६ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, गंगापूर, पैठण, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यात पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. लिंबे जळगाव, करमाड भागात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या २९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. २५ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्राने वर्तविली आहे. मराठवाड्यात गेल्या २४ तासात म्हणजेच मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत ७.४ मिमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ मिमी, जालना ५.८, बीड ४.७, लातूर ११.९, धाराशिव १२.२, नांदेड ९.३, परभणी ६.३ आणि हिंगोली १.५ मिमी अशी जिल्हानिहाय नोंद झाली आहे.


CR-Mata

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!