सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा शुक्रवारी सत्कार

सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा शुक्रवारी सत्कार

सेलू : सेलू जि.परभणी येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त; तसेच विविध स्पर्धा परीक्षा, कला क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध उद्योजक विलास पौळ उपस्थित राहणार आहेत. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरूजी, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात सकाळी ११.३० वाजता आयोजित समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक संतोष पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!