राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सेलूत निवेदन

राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सेलूत निवेदन

सेलू : परभणी येथील आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक सेलच्या वतीने सेलू येथील उपविभागीय कार्यालयामार्फत बुधवारी, २५ सप्टेंबररोजी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांना निवेदन स्वीकारले.  शिक्षकांना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी शिक्षकांची गैरशैक्षणिक कामे कमी करावीत., २००५ नंतर रूजू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, अनुदान टप्प्यावरील शाळांना सरसकट शंभर टक्के अनुदान त्वरित लागू करावे, कमी पटांच्या शाळा बंद न करता, आवश्यकतेनुसार शिक्षक भरती करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योग्य त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, चांगले शैक्षणिक कार्य होण्यासाठी ऑनलाईन कागदपत्रे, माहिती, ऑनलाईन मिटिंग, वेगवेगळे उपक्रम आदींची संख्या कमी करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिक्षक सेलचे जिल्हा सचिव धनंजय भागवत, संतोष कुलकर्णी, तोटेवाड, भाऊसाहेब निकम, नागरे, गाडेकर, शिंदे, रो़ंटेवाड, पवार, सोळंके, मोरे, बेग आदींच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!