ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिन उत्साहात
परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी फार्मसी विद्यार्थ्यामार्फत औषधी घेण्याचे प्रमाण व योग्य वेळ यासंदर्भात समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण, जनजागृतीपर फलक व सामाजिक बांधिलकीपर चर्चासत्र,फार्मसी प्रतिज्ञा तसेच विद्यार्थ्यामार्फतआरएक्स प्रतिकृती तयार करत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव शीतल सोनटक्के, समन्वयक डी.व्ही.सूर्यवंशी, प्राचार्य सलाउद्दीन ,विभाग प्रमुख नजन, पी.एन.काळे, नीलेश क्षीरसागर, जे.आर.पडोळे, श्री कुमावत, एन.व्ही.पन्नाड, श्री पवार, ग्रंथपाल श्री आवशंक यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राध्यापिका पडोळे, तर आभार प्राध्यापिका स्मरणिका शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फार्मसी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.