कीर्तनकार व कथाकारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन
सेलूमध्ये आज इंदोरीकर महाराजांचे कीर्तन, माजी आमदार विजय भांबळे यांचा पुढाकार
सेलू : तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार यांच्या भव्य सत्कार समारंभाचे व हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने गुरूवारी, २६ सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळा परिसरात करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ यावेळेत सत्कार सोहळा आहे. या वेळी वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य करत समाज प्रबोधन करून समाजाचे हित जोपासणाऱ्या तालुक्यातील कीर्तनकार व कथाकार सन्मान करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ ते ९ यावेळत हभप निवृत्ती महाराज(देशमुख) इंदोरीकर यांचे कीर्तन आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक माजी आमदार विजय भांबळे यांनी केेले आहे.