पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; विविध विकासकामांचे भूमीपूजन
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना, गुरुवारी,२६ सप्टेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आज सायंकाळी त्यांची स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. परंतु, या सभेवर जोरदार पावसाचे सावट आहे. मागील दोन दिवसांतील पावसाने या मैदानावर व सभामंडपातही पाणी असून, साचले त्याचा निचरा करून मैदान कोरडे करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रशासन प्रयत्नांची शर्थ करीत आहे.
सभेला गर्दी व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षासह महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. यासह एकूण बारा प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होईल.
जोरदार पावसाने मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि दलदल झाली आहे. त्यामुळे यावर खडी पसरविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती.