पॅरासिटामोल, पॅन-डीसह पन्नास औषधांचा दर्जा मानकांपेक्षा कमी
केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष
कोणती औषधे गुणवत्तेत कमी ? ■ पॅरासिटामोल, पॅन-डी, ■ शेलकॅल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, व्हिटॅमिल सी आणि डी ३ च्या गोळ्या, सिप्रोफ्लॉक्सिसिन ■ मधुमेहावरील टेल्मीसार्टन, अॅट्रोपिन सल्फेट ■ अॅमॉक्सिसिलिन (प्रतिजैविक, अँटिबायोटिक), पोटॅशियम क्लॅव्हल्नेट
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशात ऑगस्टमध्ये उत्पादित झालेल्या सुमारे ५० हून अधिक औषधांचा दर्जा निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण मंडळाच्या (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड स्टँडर्ड कंट्रोल अथॉरिटी, सीडीएससीओ) तपासणीत आढळले आहे. याबाबत मंडळाच्या ताज्या अहवालात माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तापावरील पॅरासिटामोल, पॅन-डी, कॅल्शियम आणि डी-३ जीवनसत्त्वाची पूरक औषधे, मधुमेहावरील गोळ्या यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे. निर्धारित मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या औषधांची यादी दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ‘औषध गुणवत्ता नियंत्रणमंडळातर्फे नियमितपणे दोष औषधांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यांचा दर्जा राखला जावा, हा त्यामागील हेतू असतो. कमअस्सल औषधे उत्पादित करणाऱ्या संबंधिक कंपन्यांविरोधात कारवाई केली जाते,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. ऑगस्ट महिन्यात केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. काही कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गोळ्यांबाबत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशभरातील मंडळे केंद्रीय मंडळाकडे अहवाल सादर करतात. मात्र, २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्टमधील अहवाल अद्याप सादर केलेला नाही.
…या कंपन्यांची औषधे नापास ? अल्केम लेबॉरेटरीज, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, हेटरो लॅब्ज, कर्नाटका अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स, नेस्टर फार्मास्युटिकल्स, प्रिया फार्मास्युटिकल्स, स्कॉट-एडिल फार्मास्युटिकल्स
दोष नेमके काय आहेत ? ■ इंडियन फार्माकोपियामधील मानकांनुसार औषधे विघटन चाचणीत (डिझोल्युशन टेस्ट) उत्तीर्ण न होणे
■ अॅसे (औषधांतील घटकांची मानकांनुसार तपासणी) आणि वॉटर (औषधातील पाण्याची चाचणी) या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण न होणे