विधानसभा निवडणूक : भांबळे यांच्या विजयासाठी बंजारा समाजाने खंबीर साथ द्यावी : महंत नेहरू महाराज
बंजारा समाजासाठी कधीही कमी पडणार नाही : मा.आ.विजयराव भांबळे
जिंतूर : बंजारा समाजाचे कुलदैवत आई जगदंबा माता यांचा भोग भंडारा कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार विजयराव भांबळे यांच्याकडून मौजे हलविरा (ता.जिंतूर) येथे २९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत नेहरू महराज तसेच महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज अमरगड, खासदार संजय जाधव साहेब, युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख महंत नेहरू महाराज यांनी प्रवचन करताना संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेल्या धर्मतत्वावर आज बंजारा समाज चालत असून, बंजारा समाज एकवचनी असल्याची साक्ष दिली. जिंतूर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून माजी आमदार विजयराव प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. त्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात. अशा समाजाला न्याय देणाऱ्या माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाठीशी खंबीर उभे रहा असे म्हणत महंत नेहरू महाराज यांनी डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. तर अमरगडचे महंत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी प्रवचन करताना आई जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, संत ईश्वरसिंह महाराज यांचा जयघोष करत संत रामराव बापू महाराज यांच्या साक्षीत माजी आमदार विजयराव भांबळे यांनी जिंतूर तालुक्यातील अमरगड देवस्थानास तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला तसेच तीर्थक्षेत्राचा विकास केला विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या अशा माजी आमदार विजयराव भांबळे यांना विधानसभा निवडणुकीत भरघोष मतांनी विजय करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले खासदार संजय जाधव यांनी बंजारा समाज दुर्गम भागात वास्तव्य करत असताना देखील त्यांच्या विकासाची कास धरणारे माजी आमदार भांबळे हे तुमच्या जवळचे आहेत. वाढेकरी जवळचा असावा म्हणून माजी आमदार विजयराव भांबळे तुमच्या जवळचे आहेत. त्यांच्या पाठीशी उभे रहा, असे मत व्यक्त केले.
बंजारा समाज माझा नेहमीच पाठीशी उभा राहिला असून माझे वडील व माझ्या काळात देखील बंजारा समाज माझ्या सोबत होता. त्यामुळे मी यापुढे देखील कधीही कमी पडणार नाही व बंजारा समाजाचा विकास व समाजास न्यायदेण्यासाठी कटीबद्ध राहील अशी ग्वाही माजी आमदार भांबळे यांनी दिली. तर बंजारा समाजाने पारंपारिक वेशभूषा, रूढी परंपरा, जपल्या असून मला प्रत्येक तांड्यांवर खूप प्रेम मिळते मला बंजारा तांड्यावरील चालीरिती नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे माझे वडील व मला देखील बंजारा समाज मला कुटुंबासारखा वाटतो. जिंतूर तालुक्यात साठ तांडे असून प्रत्येक तांड्यावर वीज, पाणी रस्ता अशा सुविधा निर्माण केल्या. अमरगड येनोलीचा कायापालट माजी आमदार भांबळे यांनी केला असे उद्गार प्रेक्षाताई भांबळे- बोराडे यांनी काढले. या कार्यक्रमप्रसंगी विनोद महाराज टोकवाडीकर, कैलास महाराज चारठाणकर यांनी मनोगत व माजी सभापती वसंतराव राठोड यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रम प्रसंगी ॲड. संजयराव भांबळे, उज्वलाताई राठोड, विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते, प्रमोदराव भांबळे, राजेंद्रकाका लहाने, रामराव उबाळे, मनीषाताई केंद्रे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, आप्पासाहेब डख, बाळासाहेब भांबळे, शंकर जाधव, प्रवीण चव्हाण, आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे, सोनाली ताई राठोड, गजानन कांगने, मनोहर सातपुते, जगदीश शेंद्रे, प्रभाकर चव्हाण, अभिजित भांबळे, बाबाराव चव्हाण नवहाती, आश्रोबा चव्हाण, संतोष राठोड, सचिन राठोड, अविनाश मस्के, सलीम काझी, जलीलभाई इनामदार, माधव चव्हाण, साहेबराव राठोड, सुधारक रोकडे, रणजीत गजमल, विठ्ठल ताठे, जिवन आवटे, दिनकर सातपुते, संजय राठोड- कोठा,देवा राठोड, रामदास आढे, पंडित जाधव, शंकर गंजे यांच्यासह जिंतूर-सेलू तालुक्यातील बंजारा बांधव हजारोच्या संख्यने उपस्थित होते तर कार्यक्रमाची चोख व्यवस्था हलविरा येथील नागरिक यांनी केली.