नूतन विद्यालयातील शिक्षकांच्या संगीत मैफिलीला प्रतिसाद 

नूतन विद्यालयातील शिक्षकांच्या संगीत मैफिलीला प्रतिसाद

नूतन विद्यालयातील शिक्षकांच्या संगीत मैफिलीला प्रतिसाद 

सेलू : येथील नूतन विद्यालयातील कै. रा. ब. गिल्डा सभागृहात सोमवार ( दि. ३० ) रोजी गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संगीत विभागाच्या वतीने आयोजित संगीत मैफिलीत शिक्षकांनी गायलेल्या भक्ती गीते, जुन्या चित्रपटातील सदाबहार गाण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेतील क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार आणि डॉ. सुरेश हिवाळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुधीर जोशी, आरती कदम, सूर्यकला सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, किरण देशपांडे, दत्ता घोगरे, मुख्याध्यापक सुखानंद बेडसुरे, परसराम कपाटे, सुनिता सांगुळे, रोहीदास मोगल, डॉ.शरद ठाकर यांची उपस्थिती होती. राजेंद्र सोनवणे, अतुल पाटील, अनंतकुमार विश्वंभर, संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे, रामेश्वर पवार यांनी संगीत मैफिलीत भक्ती गीते, जुन्या चित्रपटातील गाणी गायली. या गाण्यांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ.सुरेश हिवाळे यांनी आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!