१३ लाखांचा गुटखा पकडला; सेलू पोलिसांची कारवाई 

१३ लाखांचा गुटखा पकडला; सेलू पोलिसांची कारवाई

१३ लाखांचा गुटखा पकडला; सेलू पोलिसांची कारवाई 

सेलू : सेलू पाथरी रस्त्यावर देऊळगाव गात पाटी जवळ पाथरीकडे जात असलेल्या एका अशोका लेलँड गाडी क्रमांक एम एच २३ ए एन३५१३ मधून वाहतूक केला जाणारा १३,८६,००० रुपयांचा गोवा गुटखा सेलू पोलिसांनी पकडला आहे.

मंगळवार एक ऑक्टोबर रोजी सेलू पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत वापरलेली गाडी व मोबाईल देखील जप्त केला आहे.मानवी आरोग्यासाठी घातक असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा ७२ पिशव्यामधून एकूण किंमत १३,८६,००० हा आरोपी भारत पांडुरंग डाके रा. हात्तरवाडी ता. मानवत जिल्हा परभणी व नवनाथ राजेभाऊ बोटे रा. कुंभारी पिंपळगाव ता. घनसावंगी जी जालना हे अशोका लिलँड गाडी क्रमांक एम एच २३ ए एन३५१३ मधून वाहतूक करीत असल्याची खबर सेलू पोलिसाना लागताच त्यांनी सेलू पाथरी रोडवर देऊळगाव गात पाटी जवळ ही गाडी पकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील प्रकरणी पोह ज्ञानेश्वर संभाजी जानगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भारत पांडुरंग डाके व नवनाथ राजेभाऊ बोटे यांच्या विरोधात कलम गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामधील एक आरोपी गाडीचा चालक ताब्यात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करीत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!