फार्मासिस्ट हे आरोग्य सेवांचा महत्त्वपूर्ण आधार : डॉ.संजय रोडगे

फार्मासिस्ट हे आरोग्य सेवांचा महत्त्वपूर्ण आधार : डॉ.संजय रोडगे

श्रीराम प्रतिष्ठानच्या आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फार्मासिस्ट दिन उत्साहात 

सेलू/परभणी : श्रीराम प्रतिष्ठानच्या आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव श्रीमती डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रमुख अतिथी म्हणून वनऔषध तज्ञ अशोक वैद्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अक्षय गोविंद बन, प्रा.महेश कोल्हे व फार्मसीच्या सर्व प्राध्यापकांनी आणि फार्मासिस्ट क्षेत्रातील तज्ञांनी हजेरी लावली.

कार्यक्रमात फार्मासिस्टचे महत्त्व आणि औषध वितरणातील भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला. विविध स्पर्धा, भाषणे आणि साक्षात्कार सत्रांद्वारे विद्यार्थ्यांनी औषध विज्ञानातील नवीन तंत्रज्ञान आणि फार्मासिस्टच्या कार्याचे महत्त्व जाणून घेतले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धेत विशेष सहभाग नोंदविण्यात आला. यासह, प्रेरणादायी भाषणे आणि व्यावसायिकांचे मार्गदर्शन सत्रही पार पडले. शेवटी, विजेत्यांना सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच या औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने आपल्या परिसरात एका बॉटनिकल गार्डनची स्थापना करून शैक्षणिक आणि पर्यावरणीय योगदानात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या गार्डनचे उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्राचार्य प्रा. अक्षय गोविंद बन आणि वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक वैद्य प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ.संजय रोडगे यांनी उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “हे बॉटनिकल गार्डन विद्यार्थ्यांना अभ्यासाची नवी दिशा देईल आणि वनस्पतींविषयी त्यांचे ज्ञान वाढवेल. पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्यात या गार्डनचा मोठा वाटा असेल. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या औषधी, फुलझाडे, तसेच दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना येथे वनस्पतींच्या विविध प्रजातींचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. या गार्डनमुळे विद्यार्थी थेट नैसर्गिक वातावरणात वनस्पतींची देखभाल, त्यांची वाढ, आणि संवर्धन कसे करायचे, याचा अनुभव घेऊ शकतील. महाविद्यालयाने याबाबत विशेष कार्यशाळाही आयोजित केली होती, ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या फार्मासिस्टांच्या कार्याचा गौरव साजरा करून, विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल कुर्हे व तन्वी वडे या विद्यार्थिनीने केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!