‘ वैष्णव जन तो ‘ : महात्मा गांधी, शास्त्रीजी यांना प्रार्थना गीतांद्वारे अभिवादन
सेलूच्या नूतन विद्यालयाचा उपक्रम
सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ वैष्णव जन तो ‘ या उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महात्म्यांना जयंतीनिमित्त प्रार्थना गीते सादर करून अभिवादन केले.
नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, निशा पाटील, डॉ.महेंद्र शिंदे, सुखानंद बेंडसुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये वैष्णवी पिंपळगावकर, मानसी दलाल, समृद्धी राखे, आर्या घांडगे, दर्शना जोशी, स्नेहल जोगदंड, श्रुती कुलकर्णी, वैष्णवी बोठे, ऋतुजा महाजन, राधिका परदेशी, अथर्व तोडकर, प्रशांत इंगळे, प्रज्योत पांचाळ, आनंद राऊत, अवधूत दहीवाल, कार्तिक सातपुते या विद्यार्थ्यांनी साबरमती के संत, ईश्वर अल्लाह तेरो नाम, वैष्णव जन तो आदी प्रार्थना गीते सादर केली. पाच मिनिटे मौन पाळण्यात आले.प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले. संयोजन संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी केले. सुखानंद बेडसुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी केशव डहाळे, अरूण रामपुरकर, रामेश्वर पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नूतन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सत्याग्रह, असहकार, अहिंसा ही तत्वे महात्मा गांधी यांनी जगाला दिली. त्यांनी सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. साध्या इतकेच साधनही पवित्र असावे. ही साधनसुचिता अनुसरनाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत. असे मत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नैतिकता, राष्ट्रनिष्ठा यांचे संस्कार आपल्यावर केली आहेत. प्रेम, अहिंसेचे तत्वज्ञान आपल्या मनात रूजविणाऱ्या या दोन्ही महापुरुषांचे राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान आहे, असे प्राचार्य डॉ.कुलकर्णी म्हणाले.