प्रदेश कॉंग्रेस सहप्रभारी कुणाल चौधरी यांचा सेलू शहर कॉंग्रेसकडून सत्कार

प्रदेश कॉंग्रेस सहप्रभारी कुणाल चौधरी यांचा सेलू शहर कॉंग्रेसकडून सत्कार

सेलू : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सहप्रभारी कुणाल चौधरी व  महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची विधानसभा निवडणूक पार्शवभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षासोबत असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगत परभणी जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास कुणाल चौधरी यांनी व्यक्त केला. या वेळी काँग्रेस पक्ष निरीक्षक पी.सी.शर्मा, आमदार सुरेश वरपुडकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मिन्हाज कादरी आदींची उपस्थिती होती. या वेळी सेलू शहर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाल चौधरी यांची भेट घेउन त्यांचा सेलू शहर कमिटीच्या वतीने सत्कार केला. येणाऱ्या विधानसभा नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा करून महाविकास आघाडीच्या उमेदवारला निवडून आणण्यासाठी शब्द दिला. या वेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, मुश्ताक भाई रब्बानी, इरफान जमीनदार, नृसिह हारणे  यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!