कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आमदार मेघना बोर्डीकर

कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध : आमदार मेघना बोर्डीकर

सेलू तालुक्यातील सहा हजार कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप

सेलू : स्व:ताचा जीव धोक्यात घालून बांधकाम कामगार काम करत असतात. त्यांची सुरक्षा व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केले.

गुरूवारी, ३ ऑक्टोबररोजी कृषी महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सेलू तालुक्यातील सहा हजार कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आमदार बोर्डीकर बोलत होत्या. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, माजी उपनगराध्यक्ष संदीप लहाने, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, माऊली ताठे, रवी डासाळकर, कपिल फुलारी, गणेश काटकर, संदीप बोकन आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने तालुक्यातील सहा हजार बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आलेअसून कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी आमदार या नात्याने साभांळणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना तीन कार्यक्रमातून संसार उपयोगी साहित्याचे वाटप करतांना आनंद होत आहे. शासकिय योजना तळागळातील घटकापर्यंत पोहचत असल्याचे समाधानही वाटत आहे. मतदार संघातील लाभार्थी शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेत शासनस्तरावरून सर्व योजना प्रभावीपणे मतदारसंघात राबविल्या जात आहेत. परिश्रम करणारे बांधकाम कामगार जीव मुठीत ठेऊन काम करतात. अशा कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळाले पाहिजे, या भावनेतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळांनी ही योजना हाती घेतली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!