श्रीरामकथा कार्यालयाचे सेलूमध्ये उद्घाटन

श्रीरामकथा कार्यालयाचे सेलूमध्ये उद्घाटन

भव्य मंडप उभारणीचे काम सुरू

सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर (हनुमानगढ) राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या श्रीराम कथेचे १५ ते २३ आक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले. यासाठी कथास्थळी श्रीरामकथा कार्यालयाचे उद्घाटन, गुरुवारी, ३ आक्टोबररोजी सायंकाळी आयोजक जयप्रकाश बिहाणी यांच्या हस्ते झाले. कथेसाठी भव्य मंडप उभारणीचे कामही सुरू झाले असून उपस्थित मान्यवरांनी त्याची पाहणी केली.
याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरूजी,  चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, डॉ.राम रोडगे, मदनलाल करवा, दत्तराव पावडे, नंदकिशोर बाहेती, डॉ.शरद कुलकर्णी, विजयकुमार बिहाणी, अतुल दातार, व्यंकटेश काबरा, अविनाश बिहाणी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. नऊ दिवस चालणाऱ्या श्रीरामकथा उत्सवासाठी सात ते आठ हजार आसनक्षमतेचा भव्य वॉटरप्रुफ कथा मंडप व व्यासपीठ उभारण्यात येत आहे. याची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. कथेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!