कुंकुमार्चन पूजन सेलूमध्ये उत्साहात
भगवान श्रीपरशुराम जन्मोत्सव समितीचा उपक्रम, २७१ महिलांचा सहभाग
सेलू/परभणी : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सेलू येथील भगवान श्रीपरशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात २७१ महिलांच्या हस्ते कुंकुमार्चन पूजन झाले. सोमवारी २२१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. दोन्ही कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रारंभी श्रीजगदंबा माता, श्रीभगवान परशुराम, ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. पुरोहितांच्या वेदमंत्रघोषात देवी प्रतिमा व श्रीयंत्राचे विधिवत कुंकुमार्चन तसेच कुमारिकांचे पूजन करून महाआरती झाली.