यासेर उर्दू प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध स्पर्धा
सेलू : गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचालित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान आणि शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सय्यद इम्रान यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रोमीसा फेरोज खान पठाण, शेख इफत मुजीब, मोहमद फैज़ान ज़की, मधीहा रहीन मुजीब बागवान, इशानी हानिया हनीफ, शेख लाइबा सईद, शेख ज़ुनेरा माजीद, बागवान मुगीसा इदरीस, अल्फिया सय्यद सदैक़ इत्यादी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील परितोषिक देण्यात आले.परीक्षक म्हणून खान तहेमीना, माविया हाश्मी, शेख साजिद, सय्यद अमन यांनी काम पाहिले.