हँडबॉल स्पर्धेसाठी बाल विद्याविहार संघाची विभागीय स्तरावर निवड
परभणी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांच्या विद्यमाने ८ ऑक्टोंबर रोजी रावसाहेब जामकर विद्यालय परभणी येथे घेण्यात आलेल्या हँडबॉल स्पर्धेत बाल विद्याविहार प्रशालेतील मुले-मुलींचा संघ विजयी ठरला. या दोन्ही संघाची निवड विभागीयस्तरावर मानवत येथे होणाऱ्या हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेता मुलांच्या संघामध्ये प्रशालेतील (17 वर्षे वयोगट) आदित्य रघुनाथ आढाव , प्रणव प्रभाकर देशमुख,अधिराज वामनराव जाधव, ओंमकार आनंदराव देशमुख, पार्थ राजूभाऊ पामे, कृष्णा राजूभाऊ पामे, युवराज परमेश्वर कदम, संकेत माणिकराव ढगे, श्लोक सचितानंद देशपांडे, आदित्य दीपक जपे, साईराज महादेव हरकळ, प्रशिक चरण जमदाडे यांचा सहभाग आहे.
मुलींच्या संघामध्ये प्रशालेतील (17 वर्षे वयोगट) धनश्री अतुल गडम, समृद्धी नितीन वट्टमवार, सिद्धी सुनील सनपूरकर, आर्या महेश शिंदे, विनिशा रामा खोबे, माधुरी रत्नेश्वर भिसे, धनश्री अरुण लोखंडे, सिद्धी सुजित बाजपेयी, अन्वी योगेश पेडगांवकर, श्रद्धा संजय कुलकर्णी, सिद्धी रामेश्वर भराड, राधिका राजेश इंगोले यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.ए.झरकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक विनायक लोखंडे, विजयश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, क्रीडा शिक्षक आदित्य गायकवाड व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.