आरोग्यविषयक निबंध स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव

आरोग्यविषयक निबंध स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव

सेलू : छत्रपती संभाजी नगर येथील ग्लोबल केअर फाऊंडेशन, सेलू येथील श्रीरामजी भांगडीया रूग्ण सेवा मंडळ आणि गांधी प्राकृतिक चिकित्सा योग्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेतील विेजेत्यांना बुधवारी, ९ आक्टोबररोजी योगा हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुवर्णा नाईकनवरे म्हणाल्या की;  सुदृढ व निरोगी शरीरात निरोगी मन, विचार निर्माण होतात. सुदृढ आरोग्यातूनच यशाचा मार्ग जातो. त्यामुळे प्रत्येक पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बालरोगतज्ञ डॉ.योगिता मालाणी, महंमद इलियास, अशोक पारगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्र, टीशर्ट , प्रोटीन पावडर, पेन देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांची नावे अशी : प्रथम-दुर्गा मगर (नूतन विद्यालय), द्वितीय-अनुष्का खंदारे (नूतन कन्या प्रशाला) , अनिरुद्ध मगर (यशवंत विद्यालय), तृतीय-शेख सिमर (शारदा विद्यालय), श्रद्धा बोराडे (के.बा.विद्यालय), उत्तेजनार्थ-शेरखान पठाण (न्यू हायस्कूल), अंजना वाघ ( यशवंत विद्यालय), शुभांगी सानप (नूतन विद्यालय), प्रज्ञा साळवे  (नूतन कन्या प्रशाला) सहभागी सर्व विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक डॉ.काशीनाथ पल्लेवाड, विजय हिरे, देशमुख व परीक्षक कीर्ती राऊत यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक अशोक पारगावकर, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर भगवान पावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनारायण मालाणी, हितेश शहा, श्रीवल्लभ राठी, डॉ.शैलेश मालाणी, आनंद सोनी आदींनी परीश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!