विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा : छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडचे वर्चस्व

विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा : छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडचे वर्चस्व

२९७ खेळाडूंनी नोंदविला सहभाग 

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या वतीने विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या इनडोअर क्रीडा हॉल ८ ऑक्टोबर रोजी आयोजित विविध वयोगटात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्हा संघानी वर्चस्व मिळविले. २९७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ येणाऱ्या शालेय राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, उदय कहाळेकर, सुरेश मिरकर, पर्यवेक्षक प्रविण सोनवणे, गणेश माळवे, प्रा.के.के.कदम, डी डी सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर उपस्थित होते.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : वयोगट १४ मुले :- हर्ष मैड संभाजीनगर, कार्तिक शिंदे बीड, अक्षय वाघमारे बीड, श्रेयस उगले संभाजीनगर, अजमेर पाल जालना, रिदमिक योगा आदेश नागरे जालना, आर्टिस्टिक योगा हर्ष मैड संभाजीनगर, १७ वर्ष मुले :-सार्थक काकडे संभाजीनगर, अथर्व शिंदे संभाजीनगर, प्रांशू कुरडे बीड, शहाजी देशमुख हिंगोली, साहिल पवार संभाजीनगर, रिदमिक योगा कृष्णा परदेशी जालना, आर्टिस्टिक योगा विकास राठोड, वयोगट १९ मुले :- आर्यन बिघे जालना, बाबासाहेब लोखंडे जालना, नचिकेत आळणे परभणी, विक्रम शिंदे बीड, सुदर्शन गायकवाड संभाजीनगर, रिदमिक योगा ओम दवंगे संभाजीनगर, आर्टिस्टिक योगा आर्यन बिंगी जालना, वयोगट १४ मुली :- दिव्यापीलखाने संभाजीनगर, श्रावणी लाड परभणी, अक्षरा हरकळ परभणी, श्रुती कुंभार बीड, देवांशी टेळकीकर, रिदमिक योगा समीक्षा खंडेलवाल जालना, आर्टिस्टिक योगा पूर्वी बिडकर बीड, वयोगट १७ मुली :- सृष्टी सोळंके परभणी, वैष्णवी सोळंके जालना, आर्या केंद्रे, बीड, स्नेहल मुंडे संभाजीनगर, भाविका उपाध्याय जालना, रिदमिक योगा स्नेहल मुंडे संभाजीनगर, आर्टिस्टिक योगा गौरी रोडे संभाजीनगर, वयोगट १९ मुली :- श्रुती खंदारे , ईरा खापरखुंडीकर, स्वराली सोनवणे , श्रेया घिके परभणी, वैष्णवी शर्मा संभाजीनगर, रीदमिक योगा वैष्णवी शर्मा, आर्टिस्टिक योगा स्वराली सोनवणे, पंच प्रमुख म्हणून देविदास सोनेकर, छाया मिरकर, सुरेश मिरकर ,अंजली देशपांडे, वैद्यनाथ डोमाळे,विनायक वझे, शिल्पा पिंपळे, सुनिता डोमाळे,सुष्मिता भरदम , सुषमा सोमाणी, कांचन वसेकर, सोमनाथ महाजन, ऋतुजा कान्हेकर मेघा कदम ,शितल खंदारे, माधव देशपांडे,रामा गायकवाड ,आनंद क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!