कोल्हा-परतूर रस्ते कामाचे आज भूमिपूजन

कोल्हा-परतूर रस्ते कामाचे आज भूमिपूजन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

परभणी : आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा-३ व केंद्र शासन सहाय्य (सॉफ्ट लोन) मधील ३५५.२३ कोटी रूपयांच्या निधीतून ४४.५०० किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांचा लोकार्पण व भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शुक्रवारी, ११ ऑक्टोबररोजी सकाळी अकरा वाजता सेलू येथील रायगड कॉर्नर या ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभास पालकमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सेलू, जिंतूर मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून या रस्ते कामाला मंजुरी मिळालेली आहे. हा रस्ता जालना जिल्ह्यातील परतूर तालुका व परभणी जिल्ह्यातील सेलू आणि मानवत तालुक्यातून जाणार आहे. परतूर-सातोना-सेलू-कोल्हा-वालूर चारठाणा (राज्य मार्ग २५३) असा ४४.५०० किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!