अंशतः अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानवाढ

अंशतः अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानवाढ

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; विविध निर्णयांवर सरकारकडून शिक्कामोर्तब

प्रतिनिधी, मुंबई : सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या राज्यातील सरकारमान्य खासगी अंशतः अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानुसार राज्यातील खासगी अंशतः अनुदानित ज्या शाळांनी निकषांची पूर्तता केली आहे, अशा ८२० प्राथमिक शाळा, तीन हजार ५१३ वर्ग / तुकड्या व त्यावरील आठ हजार ६०२ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, एक हजार ९८४ माध्यमिक शाळा, दोन हजार ३८० वर्ग/तुकड्या व त्यावरील २४ हजार २८ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, तीन हजार ४० उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय, तीन हजार ४३ वर्ग/तुकड्या / अतिरिक्त शाखा व त्यावरील १६ हजार ९३२ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी विविध टप्पावर वेतन अनुदान घेत आहेत. त्यांची एकूण संख्या ८४४ शाळा, आठ हजार ९३६ वर्ग/तुकड्या/अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण ४९ हजार ५६२ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी एवढी आहे. त्यांना २० टक्के अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!