वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा

वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा

मराठवाडा शिक्षक संघाची मागणी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी : उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या पत्रानुसार खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांच्या अहर्तकारी सेवेनंतर अनुक्रमे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करावी, अशी मागणी परभणी जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरूड यांना बुधवारी (९ ऑक्टोबर) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव निशांत हाके, बी.एस.पूर्णे आदींची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की; अनेक खाजगी अनुदानित शाळेत १२ व २४ वर्ष आहर्तकारी सेवा होऊनही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जात नाहीत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे पात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळावे म्हणून उपसचिव शालेय शिक्षण यांनी संदर्भीय पत्रान्वये शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कॅम्प आयोजित करून वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढावीत, असे आदेशित केले आहे. त्यानुसार लवकरात लवकर कॅम्प आयोजित करावा. निवेदनावर मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांसह शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!