कुलस्वामिनी प्रतिष्ठान : पोस्टकार्ड संदेश चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरव
सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम
सेलू : छत्रपती संभाजीनगर येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या पोस्टकार्ड संदेश चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गुरूवारी, १० ऑक्टोबररोजी नूतन विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत रेणुका बालाजी रामपूरक प्रथम, अंतरा विजय बोकन द्वितीय, विद्या अशोक काकडे तृतीय, उत्तेजनार्थ श्रावणी प्रवीण वाव्हळ, पार्थ विठ्ठल चौधरी, जोशी विनायक प्रमोद या स्पर्धकांनी पदक व प्रमाणपत्र मिळविले आहे. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे परभणी जिल्हा समन्वयक कैलास कदम, कुलस्वामिनी प्रतिष्ठान सेलू तालुका संयोजक सचिन कोरडे, कालाशिक्षक आर.डी.कटारे, फूलसिंग गावित, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, ग्रंथापाल अंजली देशपांडे यांची उपस्थिती होती.