जिंतूरच्या ‘आयटीआय’ला श्रीगुरु नथुराम महाराज केहाळकर यांचे नाव

जिंतूरच्या ‘आयटीआय’ला श्रीगुरु नथुराम महाराज केहाळकर यांचे नाव

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते नामकरण 

जिंतूर : जिंतूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे करण्यात आले आहे.११ ऑक्टोबर,२०२४ रोजी जिंतूर – औंढा रोड परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तंत्रशिक्षण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाला हा नामकरण सोहळा झाला.

आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते नामकरण झाले. याप्रसंगी मधुकर महाराज रिडजकर, प्राचार्य श्री.लोखंडे, डॉ.पंडित दराडे, लक्ष्मणराव बुधवंत, ॲड.विनोद राठोड, दत्तराव कटारे, मुख्याध्यापक के.सी.घुगे आदी उपस्थित होते.

आमदार साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, “श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर यांचे व्यसनमुक्ती, सदाचार आणि त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान सर्व समाज घटकासाठी अत्यंत संस्मरणीय आहे, असे नमूद केले. या संस्थेचे नामकरण नथुराम महाराज केहाळकर महाराजांच्या नावावर होणे हा सर्वांसाठी मोठा गौरवाचा क्षण आहे. नामकरणामुळे संस्थेला नवचैतन्य मिळेल.”

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आणि या नामकरणाने संस्थेच्या यशस्वी वाटचालीत नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!