‘येलदरी’ चे दहाही दरवाजे उघडले
पूर्णी नदीपात्रात २३,७०० क्युसेक विसर्ग
परभणी : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून शनिवारी, १९ ऑक्टोबररोजी दुपारी चार वाजेपासून पूर्णा नदीच्या पात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत वीज निर्मिती केंद्रातून ३ टर्बाइनने २६०० व स्पीलवे गेट क्रमांक एक ते दहाद्वारे २११०० क्युसेक असा एकूण २३७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. येलदरी जलाशयावरील खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्याचा परिणाम येलदरी जलाशयात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास येलदरी जलाशयाचे सहा गेट ०.५ मीटरने उचलण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ क्रमांक दोन, तीन, चार, सात आठ आणि नऊ हे दरवाजे उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत वीज निर्मिती केंद्रातून ३ टर्बाइनने २६०० व स्पीलवे गेट क्रमांक एक ते दहाद्वारे २११०० क्युसेक असा एकूण २३७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलाशयात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. पूर्णा नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी केले आहे.