श्रीरामरक्षा स्तोत्र पठणाने राममय वातावरण; सेलूतील गीता परिवारचा उपक्रम

श्रीरामरक्षा स्तोत्र पठणाने राममय वातावरण; सेलूतील गीता परिवारचा उपक्रम

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांची उपस्थिती; सेलू शहरासह ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

सेलू/परभणी : सेलू येथील गीता परिवाराच्या वतीने राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक श्रीरामरक्षा स्रोत पठण कार्यक्रम रविवारी, २० ऑक्टोबररोजी आयोजित करण्यात आला होता. सेलू शहरासह ग्रामीण भागातील शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. श्रीरामरक्षा स्तोत्र पठणाने राममय वातावरण झाले होते. या वेळी योगा व सूर्यनमस्कार, श्रीमद् भगवद्गीता पठण, देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरण, ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

सेलूतील समर्थ ॲग्रो आणि गजानन ॲग्रो इंडस्ट्रीजच्या परिसरात हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी श्रीरामकथेचे संयोजक विजयकुमार बिहाणी, गीता परिवारचे मराठवाडा प्रमुख लक्ष्मीकांत करवा, सचिव संगीता तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सादर केले. तसेच सेलूतील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. प्रभू रामचंद्रांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीतापठण केले. सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने विविध देशभक्तीपर गीत सादर करून स्वामीजीसह उपस्थितांची दाद मिळवली.

नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, शारदा विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, पोदार इंग्लिश स्कूल, यशवंत प्राथमिक विद्यालय, न्यू हायस्कूल, केशवराज बाबासाहेब विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, ज्ञानतीर्थ विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सामुदायिक श्रीरामरक्षा स्रोत पठण करून स्वामीजीसह उपस्थितांकडून दाद मिळवली.

प्रास्ताविक अर्पण मंत्री यांनी केले. सूत्रसंचालन सतीश बाहेती, कांचन बाहेती यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.सत्यनारायणजी लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, डॉ.संजय रोडगे, ॲड.अनिरूद्ध जोशी, डॉ.सुजित मालाणी, महेश खारकर, साईराज बोराडे, अशोक काकडे, डॉ.सुनील कुलकर्णी, रामकिशन आबा सोळंके, नंदकिशोरजी बाहेती, डॉ.जनार्दन गोळेगावकर यांच्यासह मान्यवर, गीता परिवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमानंतर योगेश महाराज साळेगावकर यांच्या स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल येथे स्वामीजींनी भेट देऊन, तेथील विद्यार्थ्यांचेदेखील कौतुक केले.

मुलांनो, भारत देशावर प्रेम करा : नियमित रामरक्षाचे पठण केल्यानंतर आलेले संकट सहजतेने दूर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित रामरक्षाचे पठण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दररोज स्मरण करावे. आपल्या भारत देशावर प्रेम करावे, भारत माता की जय, लव्ह भारत, अशा जयघोष करावा, असे स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यावेळी म्हणाले. सूर्यनमस्कार, श्रीरामरक्षा, श्रीमद्भगवद्गीता पठण व देशभक्तीपर गीते सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!