मराठवाडा भूषण डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

मराठवाडा भूषण डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

सेलू :  नाशिक येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ.संजय रोडगे यांचा एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व प्रॉस्परस पब्लीक स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या प्रगती क्षीरसागर, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सेलू तालुक्यासारख्या छोट्याशा गावामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची शाळा निर्माण केली. मुलांचे भवितव्य चांगले घडवण्यासाठी शाळेत रोबोटिक लॅब इंग्लिश लॅब राजीव गांधी विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. तसेच मुलांनी या सर्व सोयींचा वापर करून भविष्यात मोठी पदवी मिळवावी अशी अपेक्षा डॉ.रोडगे यांनी या वेळी व्यक्त केली. सूत्रसंचालन कल्पना भाबट व सारिका ताठे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!