विधानसभा निवडणूक : परभणी जिल्ह्यात १८२ इच्छुकांना ३०७ अर्ज वितरीत
परभणी : जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांना उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहेत. शुक्रवार (२५ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकूण १८२ इच्छुक उमेदवारांना ३०७ अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर एकूण २६ इच्छुकांनी ३२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिंतूर मतदारसंघात ५० इच्छुकांना ९०, परभणीमध्ये ६४ इच्छुकांना १०७, गंगाखेडात ५६ इच्छुकांना ८८, तर पाथरीमध्ये १० इच्छुकांना २२ अर्ज वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी जिंतूरमध्ये आतापर्यंत ११ उमेदवारांनी १३, परभणीत ४ उमेदवारांनी ५, गंगाखेडमध्ये एका उमेदवाराने २, तर पाथरीत १० इच्छुकांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.