भाजपचे आनंद भरोसे यांच्या हाती धनुष्यबाण

भाजपचे आनंद भरोसे यांच्या हाती धनुष्यबाण

शिंदे यांच्या शिवसेनेत; मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

मुंबईत

परभणी : परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राहुल पाटील यांच्या विरोधात कोणाची उमेदवारी निश्चित होते, भारतीय जनता पक्ष लढतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला परभणीची जागा सुटते याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे आनंद भरोसे यांनी आज शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या दोन दिवसांपासून भरोसे यांनी मुंबईतच तळ ठोकला होता. भरोसे यांना परभणीची उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे परभणीतील लढत दोन शिवसेनेत होणार हेही आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष श्री. आनंद शेषराव भरोसे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत ठाणे येथे शनिवारी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, सुभाष साळुंखे उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!