देऊळगाव गात : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील देऊळगावगात येथे मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत देऊळगाव गात ते रवळगाव शेतरस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (सात मे) झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिवसेना गटनेते तथा जिंतूर-सेलू विधानसभा प्रमुख रामनाना पाटील खराबे, पंचायत समिती सदस्य गोपाळ कदम, युवा सेना तालुका प्रमुख अतुल डख तंटामुक्ती अध्यक्ष त्रिंबक अप्पा कदम, सरपचं रविंद्र गोरे, बंडु नाना कदम, उपसरपंच अक्षय कदम, विष्णुतात्या कदम, ॲड. दत्ताराव कदम, दत्ताराव तांबे, शिवराम कदम, अनिल कदम, गोरख शिलार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.