जिंतुरचा करीमलाला संघ विजेता, जालना उपविजेता, परभणी, सेलूला तृतीय पारितोषिक
सेलू (जि.परभणी) : येथील डॉ.संजय रोडगे मित्र मंडळातर्फे आयोजित, ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल नाईट लीग क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी ( सात मे) झाले.
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दहा दिवस या स्पर्धा चालल्या. समारोपप्रसंगी डॉ.संजय रोडगे, परभणी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, त्र्यंबकबापू बोराडे, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे, रामराव रोडगे, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, दीपक रोडगे, रघुनाथ बागल, इसाक पटेल, अशोक बोडखे, प्रगती क्षीरसागर, मीनाक्षी रत्नपारखी, बबन सोनावणे, कार्तिक रत्नाला, शालिनी शेळके आदींची उपस्थिती होती.
रोडगे प्रीमिअर लीगमध्ये जिंतुरचा करीमलाला संघ विजेता ठरला, तर पीकेजी जालना उपविजेता राहिला. तुलसी परभणी व सेेेलू येथील सनराईज क्रिकेट क्लबला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. या वेळी वाढदिवसानिमित्त डॉ.रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महादेव साबळे, राजेश काळे, संजय ठाकर, राजेश राठोड, सलमान खान, समालोचक मनोज काळे, अनिल शेळके, मोहन बोराडे, अमोल पगारे यांनी परिश्रम घेतले.