विधानसभा निवडणूक : जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात मतदार जनजागृती

विधानसभा निवडणूक : जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात मतदार जनजागृती

जिंतूर : जिंतूर येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालय परिसरात चुनाव पाठशाळा, लोकशाही गप्पा आणि पथनाट्य याद्वारे स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे, शितल कच्छवे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे. अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले व साहित्यिक मयूर जोशी यांनी केले. स्वीप पथकातील सदस्य राजेंद्र ढाकणे यांनी मतदारांना मतदान करण्याबाबतची प्रतिज्ञा घेतली. केंद्रप्रमुख मारुती घुगे, दिनकर घुगे, प्रमोद दाभाडे, प्रभाकर नालंदे, नितीन पेठे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नवमतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार, आणि सर्वच मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!