बोरीतील मतदान केंद्राची निवडणूक निरीक्षक यांनी केली तपासणी
जिंतूर : तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेमधील संकुलामध्ये एकूण १२ बोरी तांडा १ व नागापूर येथे १ असे एकूण बोरी मधील १४ मतदान केंद्रांची तपासणी मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक निरीक्षक श्रीमती के.हरीता यांनी पाहणी करून तपासणी केली.
यामध्ये बोरी व बोरी परिसरामध्ये मतदान केंद्र क्रमांक २७१ ते २८४ असे एकूण १५ मतदान केंद्र असून यापैकी अतिशय संवेदनशील अशा मतदान केंद्र क्रमांक २८१ या केंद्राची विशेषतः मा. निवडणूक निरीक्षक मॅडम व त्यांची टीम यांनी पाहणी करून त्याचा बीएऐ यांच्याकडून आढावा घेण्यात आला. बोरीमध्ये सर्व मतदान केंद्राची तपासणी केल्यानंतर निवडणूक निरीक्षक व त्यांची टीम जिंतूर मधील आरटीआय कॉलेजला भेट देऊन तेथील स्ट्रॉंग रूम ,ट्रेनिंग हॉल व मतदानासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व साहित्याची पाहणी केल्यानंतर, तहसील कार्यालय, जिंतूर येथे जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार राजेश सरवदे, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. येणारी निवडणूक अतिशय शांततापूर्ण व निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देशानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज राहील याकरता सर्व मतदान केंद्र सज्ज असून प्रशासनही तयार आहे. सर्व नागरिकांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राजेश सरवदे यांनी केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बेनिवाल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी युवराज पोळ, नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे, प्रशांत राखे,पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, मंडळ अधिकारी मोहसीन पठाण, तलाठी हनुमान बोरकर तसेच सर्व बीएलओ व इतर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.